Friday, January 1, 2010

मी आणि माझा शत्रुपक्ष : स्वघोषित साहित्यिक - एक पीड़ा

माझेही काही शत्रु आहेत... आता शिकारी लोक सापडणे फार दुर्मिळ झाले आहे (कारण शिकारीला प्राणीच उरलेनाहित... मुद्दलात शिकार नाही तर शिकारी कुठून येणार ...) आणि पाळिव प्राणी ह्या विषयावर बोलाल... तर .... हेहे.... मीच दुसर्या वर्गात मोडतो... माझ्याकडेच कुत्रा आणि मांजर हे दोन्हीही प्राणी आहेत.... (एकाच वेळी...) तसेट्रेनिंग च दिले आहे मी त्याना.... अगदी गुणी आहेत हो आमची मांजरे.... कधी चोरून दूध पिणार नाहित.... हां... आता कधी कधी त्यानी बाहेरून खेलायाला आणलेला उंदीर त्यांच्या तावडीतुन निसटतो आणि घरात थोडा गोंधळघालतो.... पण आता जीव म्हटले की चुका होणारच... आणि आमचा स्पाइक पण... स्पाइक म्हणजे आमचा कुत्रा... काय पण Labrador आहे... वा... असा अस्सल lab शोधून पण नाही सापडणार... केवढा हुशार आहे.... paper घेउन येणे... ball कैच करणे ह्या गोष्टी म्हणजे स्पाइक च्या अगदी डाव्या पायाचा मळ... अगदी परवाचीच गोष्ट... जाऊ दे... विषयांतर नको..... तर मतितार्थ हां की आमच्याकडचे सर्व प्राणी अगदी गुणी आहेत... आणि त्यामुलेमाझ्या शत्रुपक्षात थोड़े different लोक आहेत...

उदा.प्रवासात मोठमोठ्याने फ़ोन वर बोलणारे लोक... दादानो/ ताईनो तुमच्या कडे फ़ोन आहे ... माहीत आहेआम्हाला... का जाहिरात करता.... पुण्याच्या ट्राफिक सिग्नल वरील पोलिसमामा (आदर नितान्त आहे.... पणआदरयुक्त भीती पण आहे... माझा खिसा तर जाम भितो ह्याना... अनेकदा मला पकडले पण कधीच पावती नाहीफाडू दिली.... माझी इच्छा असुनही)...... राजकारण्याशी नाते सांगणारे लोक... (अरे तुला म्हणून सांगतो... अमुकअमुक साहेब आपल्या शब्दा बाहेर नाहित... आता आपल्याला ते वशिला लाउन काम करणे आवडत नाही.... नाहीतर काय अवघड आहे का आपल्याला तमुक तमुक गोष्ट करायला... साहेब तर नेहेमी आपल्याला म्हणतात... "
साहेब ( इथे 'ते' साहेब... ह्या 'साहेबाना' 'साहेब' म्हणतात... ), काय काम असेल तर नि:संकोच सांगा... तुम्ही एवढी जनतेची शेवा करता ... लोकांची कामे करता ..... आम्हाला तुमच्या शेवेची संधि द्या..."
पण आपण तत्वाने वागणारा माणूस.... आपल्याला नाही पटत.... म्हणून आपण मागे..... इ.इ.)

पण हे लोक तात्कालिक असतात... जोरदार पाउस जसा थोड़ा त्रास देतो... पण लगेच निघून जातो तसे... जास्तीतजास्त १-२ तास खातात महिन्यातून..... पण ह्या सर्वांपेक्षा चिवट आणि स्वसंतुष्ट एक जमात असते.... ती म्हणजे
स्वघोषित साहित्यिक


हे लोक लिहितात.... बर... नुसते लिहून थांबत नाहित.... लिहून ते ब्लॉग वर टाकतात.... बर ... ब्लॉग वर टाकुन स्वस्थ पडावे ना... नाही... आमच्या सारख्या निष्पाप जिवाना पकडून ते वाचायला लावतात.... नुसते वाचन नाही ... तर अभिप्राय द्या ... comments द्या... म्हणून जीव नकोसा करतात... आता कुणाला दुखवू नये म्हणून
"हेहे ... चांगला लिहिला आहेस...nice work.. keep it up...."
असे लिहिले तरी ह्यांचा जीव शांत होत नाही.... त्याना साहित्यीक अभिप्राय हवे असतात.... आणि नेमका अश्या लोकांच्या तावडीत मी नेहेमी जाऊन सापडतो... च्यायला.... मी एक software engg... माझा आणि साहित्याचा काही सम्बन्ध नाही... माझ्या दृष्टीने साहित्य म्हणजे मटेरिअल किंवा फार तर फार anything that can be used to perform some work.. आता ह्यांच्या लिखाणाने काय काम करता येइल???...... नाही म्हणायला एकदाफ़ायदा झाला होता... कसले तरी टेंशन होते.... झोपच येत नव्हती... रात्री कोणी बकरा ऑनलाइन आहे का म्हणूनशोधत होतो... तेवढ्यात मीच बकरा झालो... एका मित्राला .... त्यालाही निद्रानाश झाला होता... कविता सुचलीहोती... आता सुचली होती का फ्रेंच कविता सापडली होती आणि त्याने ती टेपली होती हा प्रश्न मला होता..... पण ४कड़वी वाचेपर्यंतच काय होत होते ते मला आठवते... नंतर दुसर्या दिवशी माझे मित्र मला उठवत होते...
"अरे... तब्येत बरी आहे ना... १४ तास काय झोपलास... deadline आहे ना तुझी .... .."
माझी शंका दूर झाली.... अशी कविता त्यालाच सुचू शकते.... पण लेकाचे आभार मानले मी..... त्याला बोललो... "तुझी कविता वाचून मला नविन शक्ति मिळाली.... एकदम फ्रेश झालो मी.... सर्व थकवा निघून गेला... " अजुन बराच चढवला होता मी त्याला... अगदी परवा पर्यंत तो मला साहित्यातील दर्दी , कलात्मक जाण असलेला वगैरे मानत होता.... पण गेल्याच आठवडयात आमचे एक मित्रवर्य पिऊ नये ते, पिऊ नये तितके, प्यायले आणि ह्याच कवी समोर... हा प्रकार एक तूफ़ान विनोदी किस्सा म्हणून सांगुन आडवे झाले.... त्यादिवसानंतर तो कविवर्य
"मी एक पाजी मनुष्य आहे आणि मला चेष्टा करण्याशिवाय काही येत नाही"
हे (कटुसत्य) सर्वाना सांगत सुटला आहे... वास्तविक पाहता मी त्याला काही खोटे बोललो नव्हतो... पण त्यानेमाझ्या comments चा साहित्यीक अर्थ घेतला होत.. चुक त्याची होती... जाऊ दे...त्याच्या नविन निर्मिती मलासहन नाही कराव्या लागणार हा एक फ़ायदा आहे.... ह्या एकाच कारणाने मी माझ्या मित्राला मोठ्या मनाने माफ़केले.... शेवटी प्रत्येक negative गोष्टीत पण काही तरी positive असतेच की....

पण कुणालाही दुखावायाचे नाही आणि कुणाच्याही प्रयात्नाना वाईट म्हणायचे नाही , हे तत्त्व मी लहानपणा पासूनमी follow करत आहे... (सरळ आहे .... आपण प्रयत्न पण करत नाही... मग जो करतो आहे त्याला कशाला नावेठेवा.... असा आपला साधा
सरळ विचार...) आणि काही वर्षांपूर्वी पर्यंत ह्या गोष्टीच विशेष त्रास पण होत नव्हता....
म्हणजे कोणी आलेच जवळ कविता/लेख घेउन... तर मी म्हणायचो
"
अरे... थोडा कामात आहे... ठेऊन जा.... मी वाचून सांगतो...."
मग थोड्या दिवसानी त्याने विचारले की...
"अरे... सॉरी सॉरी.... वे नाही झाला रे... थोडा वे देतोस का...."
असे जरा त्याला थाम्बवाले की मग अगदी विचार वगैरे केल्या सारखे दाखवून काही दिवसानी स्वत:हून त्यालापकडायचे आणि म्हणायचे....
"अहो मोठे लोक... आहात कुठे.... काय अप्रतिम लिहिले आहेस..... पण मला असे वाटते की तू अजुन तुझ्या क्षमतेला पूर्ण न्याय नाही देत आहेस..... (ह्याचा अर्थ मला आज पर्यंत नाही माहीत.... पण बोलायला आणि ऐकायला छान वाटते...) असेच लिहित रहा .... (पण माझ्या पासून दूर ठेव.... हे मनातल्या मनात....) मी तर म्हणेन अजुन चांगले लिहित जा (अस्सल पुणेरी टोमणा) पण एक सांगू का... माझ्या पेक्षा तू ह्या अमुक अमुक लोकाना का नाही दाखवत... त्याना जास्त जाण आहे ह्या गोष्टीत.. (मी एकट्याने का म्हणून torcher सहन करायचे.... हे पण मनातल्या मनात) इ.इ."

मग काय समोरचा गार होतो आणि आपल्याला गरम गरम चहा पाजतो... जास्तच मूड मधे असेल तर मस्त भजीकिंवा मिसळपाव पण... इकडे कष्टांचे चीज होते.... (अगदी शब्दशः...)
पण ब्लॉग ह्या पद्धतीने मात्र अगदी पंचाईत करून टाकली....
एका वेळी किती पण लोक वाचू शकतात... समोरच्याकडे एकच प्रत असण्याचे फायदे नष्ट होतात... आणि चांगल्या अभिप्रायाचे चीज पण नाही होत... सगळ्यात वाईट ते असते.... आता ब्लॉग चा हयात काही दोष नाहिये तसे पाहिले तर.... चांगल्या कामासाठीवापरता येतेच की... पण चांगला वापर करेल तो मनुष्य कसा.... (मी पण त्यातच येतो... खोटे का बोला)

हे स्वघोषित (नव-ब्लॉग) लेखक... स्वत:ला मारे थोर कवी/लेखक समजतात...प्रस्तावना कशी असते.... कंसातिलवाक्ये माझे मनोगत... अर्थात मनातल्या मनात....
"मी काही कवी/लेखक नव्हे... (अरे माहीत आहे ना तुला पण... मग का लिहितो... वीज का वाया घालवतो... इथे खेडोपाडी १६-१६ तास भार नियमन होते.... वीज निर्मितीसाठी प्रदुषण होते... त्यामुले global warming वाढते... तूच जबाबदार आहेस ह्या सर्व परिस्थितीला... कण्ट्रोल प्रसाद कण्ट्रोल.... अजुन १च ओळ झाली आहे.... मुख्य युद्ध अजुन दूर आहे ) मी पेशाने एक अमुक अमुक अमुक... (अरे जे आहेस ते धडपणे कर की..... कशाला दुसर्यागोष्टीत नाक खुपसतो.... जे आहे त्यात इंटेरेस्ट नाही.... मग फिल्ड बदल... पण माणसाचे असेच असते) ..... पण आयुष्यात अनेक विलक्षण अनुभव घेता घेता मन खिन्न झाले ( ह्या लोकांचे विलक्षण अनुभव म्हणजे.... कधी तरी सर्व मुलांनी common off घेतला तेव्हा ह्यानी मोठा धीर करून सरांची परवानगी काढायची हिम्मत केलीआणि सरानी ह्याना झापला... किंवा... एखादी मुलगी आवडली म्हणून तिच्या मित्राला (आपल्या ग्रुप मधे, त्याच्यासमोर नाही ) जोरदार शिव्या घातल्या.... इ.इ..)..... आणि मग अश्या ह्या अवस्थेत विचारांच्या डोहात सफ़र करता करता "सहजच काही सुचले म्हणून "

आता अश्या ब्लॉगचे नाव काहीही असू शकते... खिन्न अवस्था कधी कधीप्रसन्न अवस्था असू शकते... नाव सुद्धा बदलू शकते...
माझ्या मनाचा आरसा, मनातील विचार, विचार डोहातील काही भोवरे.....
ह्या पैकी काहीही..... थोड्या फार फरकाने असाच काहीसा अर्थ असतो...

कविता करताना आपण अगदी थोर कवी असल्या सारखे जीवन विषयक तत्वे मांडतात.... प्रसिद्ध कवींच्याकवितान्माधुन ओळी मधून उचलतात आणि उगीचच हे असेल वागणे मला मंजूर नाही सांगत सुटतात.... मी कसा स्वच्छंदी आहे , मनस्वी आहे सांगत सुटतात... अरे स्वच्छंदी असातर ते तुमच्या वागान्यातुन, लिहिन्यातुन दिसले पाहिजे.... एक साधा चहा करताना तुम्ही १०० जणान्ना विचारता ... चव बिघडली तर कोण काय म्हणेल ह्या विचारात असता आणि आव आणता स्वच्छंदीपणाचा... खर बोलायच तर स्वच्छंदी नसलेल्या लोकानाच असे ओरडत सांगावे लागते मी स्वच्छंदी आहे , मी मनस्वी आहे... जे खरे स्वच्छंदी कलावंत असतात त्यांच्या स्वच्छंदी पणाचा कुणाला त्रास होत नाही... पण ह्या लोकांचा जो स्वच्छंदी वागण्याच्या आव असतो तो म्हणजे.... अरे मी कुणाचा पण अपमान करीन... मी फार भारी आहे... असा असतो..... हा असला ओढून ताणून आणलेला स्वच्छंदीपणा एखाद्या वारानिशी गलून पडतो.... आणि हे लोक लगेच defensive mode मधे जातात.....अश्या वेळी ह्यांचा राग येता कीव येते.... लोकाना वाटेल मी हे चिडून लिहित आहे... पण ज्याचे जलते त्यालाच कलते... कायत्रास होतो अश्या लोकांचा... नाही कळणार..... हे अनुभवल्या शिवाय नाही णार.... पण जाऊ दे... असे अनुभवन आलेलेच बरे.... आहात तसेच सुखी आहात....
पण पुढचा लेख वाचताना कीव परत संतापाला जागा करून देते.....
कुठे तरी वाचलेले असते की हा थोर कवी आधी सरकारी कचेरी मधे होता... मग लगेच ह्यांचे ऑफिस ह्याना तसे वाटू लागते..... ह्यांच्या प्रतिभेला वाव मिळत नाही असे वाटू लागते.... लगेच कागद घेतात (काल एडिटर उघडतात comp वर) आणि लिहायला सुरुवात करतात.... कुठे "आले" ला "गेले" ... "समजे" ला "उमजे" असेल यमक जुळवत बसतात...नाही तर उगीच "हे जीवन मिथ्या आहे..." किंवा "आजच्या समाजात खर्या कलावान्ताला मान नाही...." इ.इ.खरबसतात...
एका कविचे उदा.
मी आज उत्तम शिक्रण केले, ते खाऊन आमचे मांजर देवाघरी गेले....

अरे काय अर्थ, का काय आहे कवितेला.... पण नाही... यमक आले ना... मग झाले...

माझा एक मित्र आहे.... एक प्रसिद्द हिंदी/उर्दू कवी त्याचे प्रेरणास्थान आहेत..... सर्व ठिकाणी लिहित असतो की मी ह्याच्या पासून स्फूर्ति घेतली... ते हिंदी मधे करतात (करायचे... गेले बिचारे.... खर तर सुटले.... ह्याच्या कविता ऐकल्या असत्या आणि कळले असते की हेत्याचे स्फूर्तिस्थान आहेत... तर धक्क्याने गेले असते) म्हणून मग हा पण हिंदी कविता करतो... खर तर ह्याचे हिंदी म्हणजे ...
"वो चहा कप में ओतते ओतते मेरे हात पे सांडा और मेरा हात बहुत भाजा....."
स्टाइल..... पण एकदा स्फूर्ति स्थान ठरवले की मगणार नाही .... मग हिंदी वर्त्तमानपत्रामधून नाही तर त्याच कविच्या कवितान्माधुन "चलो" ला "मिलो" , "सुन" ला "बुन", "डरो" ला "भरो" असे काही तरी जुळवत बसतो.... आता नाही म्हटले तरी त्याला चार लोक ओळखतात कवी म्हणून.... त्याची आई, त्याचे वडिल, मी आणि माझा एक समदु:खी मित्र.... झाले की चार लोक.... पण हा भिडू दिवासेंदिवास सुटतच चालला आहे.... री मधे असताना त्याने केलेल्या कवितेचे वर्गात कौतुक झाले होते... ते अजुन मनात धरून आहे... म्हणतो....

"ते गुरूजी गेले रे... त्याना खरे कौतुक होते माझ्या कलेचे... आज काल असे लोक कमी झाले आहेत रे... कलेची जाण असणारे... ७ वी पासून मी नियमितपणे कविता करू लागलो... त्याना दाखवायचो मी... पण मी ८ वी मधे असताना अचानक मनावर परिणाम झाला रे त्यांच्या... संतुलन घालवून बसले... काय माहित कशाने ????" वर हा प्रश्न....

अजुन एक मित्र आमचा... कोणीतरी प्रेयसी आहे ह्याची काल्पनिक... तिला उद्देशून कविता चालु असतात... माझ्या सखे... अशी सुरुवात... च्यायला जो माणूस प्रत्येक गोष्टीत जीवनविषयक तत्वद्न्यान शोधतो त्याला कोण सहन करू शकेल.... एकदा एका कुत्र्याशी त्याचा मालक ball ने खेळत होता.... आम्ही मस्त चहा पीत होतो..... ह्या महाराजांचे सुरु शुन्यात बघून ...
" माणसाने आज माणसालाच गुलाम करून टाकले आहे.....अगदी ह्या कुत्र्यासारखे....कोणी तरी कोणाच्या गळ्यात पट्टा बांधायचा आणि खेळवायाचे २ घटका.... पण त्या क्षणी ही अद्न्यान माणसे विसरतात.... की ते पण तर नियतीच्या हातातील कुत्रेच आहेत... आत्ता नियती पण त्यांच्याशी खेळत आहे.... पट्टा ढीला आहे आत्ता... पण जेव्हा नियती हाच पट्टा करकचेल तेव्हा तुम्हाला तो फास वाटेल... "

मस्त शनिवार सकाळ होती (फ़क्त ११.४५ झाले होते) ... बुवांचा "पेशल चा" होता.... पण हे ऐकून तो पण घश्याखाली (नरडयाखाली जास्त योग्य राहील) उतरेना.... शेवटी पैसे देऊन निघू लागलो तर तो टपरीवाला पप्या आम्हाला विचारत होता हळूच... काल जास्त झाली का.... नेहेमीचा टपरीवाला तो... त्याला मग जवळ जाउन समजावले... ज़रा सटकलेली केस आहे..... तर टपरिवाले बुवा म्हणे....
"शनिवारचा उपास करायला लावा... बघा नीट होइल की नाही...."
अश्या मुलाला कशी एखादी मुलगी हो म्हणेल....
हाच हीरो एकदा जंगलात गेला होता.... चांगले असते ... कधी कधी चेंज म्हणून चांगले असते... तेवढीच शांतता लाभते मनाला... मित्रांच्या... परत येऊन साहेब सुरु...
"अरे तिकडे एक माकड पाहिले.... मस्त उड्या मारत होते.... स्वछन्द... कुणाचे भय नाही... टेंशन नाही.... अगदी मुक्तपणे खेळत होते..."
आमचा एक फिरकी घेणारा मित्र लगेच त्याला मधे तोडत ...
"
तू जसा शब्दांमधे संचार करतोस तसे..... मित्रा... तू पण तर माकड नव्हे का शब्दांच्या दुनिये मधला...."
महाराज विनोद वगैरेच्या पलिकडे गेले होते...
"
हो हो... माकड म्हणा हवे तर... शेवटी हनुमान पण तर माकडच होते... आपले पूर्वज पण माकदाच होते....."
सरकार थाम्बतनव्हते.... शेवटी २० मिनिटे माकड पुराण आणि माकड अणि सरकार (शब्दांच्या दुनियेत) हयात जास्त उड्या कोण मारतो ह्या प्रश्नाचे उत्तर "सरकार " असे आल्यावर स्वारी थांबली.... नंतर त्याने एक कविताऐकवली... त्याच काल्पनिक प्रेयसीला उद्देशून....
"सखे... तू अशी माझ्या समोर येतेस.... मी तुला काही बोलताच.... मन्दसे हसून निघून जातेस..... कधी मिश्किल हसतेस... कधी छद्मी हसतेस.... हसता हसता माझ्या हृदयावर किती वार करतेस... एकदा चिडून गालावर फटका मारला होतास तू... नंतर माझा विचार करून खिन्न झाली होतीस तू.... पण हे तुला नाही लक्षांत आले... तुझ्या स्पर्शाने पण सुखावलो होतो मी..."
ही कविता ऐकवली होती...
त्याच्या ह्या अनमोल विचारांनंतर त्याला जबरदस्तीने सगळे आता शनिवारचा उपवास करायला लावतात.... अजुन त्याच्या कविता तर नाही सुधारल्या... पण आम्हाला शनिवारी त्याच्याकडून खिचडी, शिक्रण आणि कुठलीही एक मिठाई (generally पेढे) असते.... so...मारुतीरायाच्या कृपेने आता त्रास खुपच सुसह्य झाला आहे....
तर असा हा सर्व त्रास आहे... कधी तरी मी काही साहित्यीक शब्द बोलुन गेलो आहे....आणि एका (स्वघोषित) कविच्या उपमा दूसरी कडे वापरल्या आहेत.... (बाकी उपमा मला खायला जास्त आवडतो... देण्यापेक्षा... पुण्याची खासियत... कुणाला काही देण्यापेक्षा खाणे बरे....) शेवटी पापे इकडेच फेडावी लागतात हेच खरे... आता माझे मित्र काहीही लिहिले तरी मला देतात.... आता हेच लिहिता लिहिता links आल्या आहेत ....
१.आठवणीची दुनिया
२.एक कोमेजलेली संध्याकाळ (वेळ पण कोमेजाते????? माझा विचार )
३.मी का लिहितो....??? - एक आत्मचिंतन (हा प्रश्न नसून मी लिहिणे समाजाला कसे हितकारक आहे ह्यावर एक प्रबंध असणार ह्या वर मी पैज लावायला तयार आहे...)

वरील ही लेखक हे चांगले engg आहेत... पण ऑफिस मधे सध्या कुणालाच काम नाही... मग keyboard वर बोटे मारल्याचा आवाज आणायला म्हणून लिहितात (यूरेका... ३र्या प्रश्नाचे खरे उत्तर सापडले ) आणि मग गेल्या जन्मिच्या ह्या क्रन्तिकारकाना मी इंग्रज बनून जे पिडले होते त्याचा बदला घेतात.... त्यांच्या भाषेत ते ह्या जन्मी पण क्रांतिकारकआहेत... पण अहो... मी आता इंग्रज नाही त्याचे काय?????

चला प्रतिक्रिया लिहू आधी... लेख निवांत वाचू.... असाही... सौर्स कोड नंतर अल्गोरिथम लिहिणारे लोक आम्ही... इथे तरी का ती प्रथा सोडू... :)
पहिल्या लेखाची प्रतिक्रिया...

"तुझी स्मरणशक्ती म्हणजे कमाल आहे..... भावा,
नादखुळा आहेस... (लेखक कोल्हापूरचा आहे... लेखकाचे गाव लक्षात ठेवावे... म्हणजे त्याला पहिल्या वाक्यात गार करता येते... आणि मग गरम चहा गैस वर चढतो... इथे त्याला पुणेरी टोमणा समजणार नाही ... खुळा हा शब्द येथे पुणेरी अर्थाने आहे), कुठल्या कुठल्या गोष्टी तुला लक्षात आहेत.... (येथे एक अदृश्य ? आहे... कारण मला खरच माहीत नाही) काय धमाल केली होतीस तू... आपले किस्से लक्षात आहेत ऩा??? नाही मोठी माणसे तुम्ही... सर्व किस्से नाही लिहिले आपले... (आता बसेल २ दिवस आठवत... मग आठवेल... आम्ही काहीच किस्से नाही केले... हेहेहे ... गनिमी कावा म्हणतात याला पण )

दुसर्या लेखाची प्रतिक्रिया :

"मन खिन्न झाले वाचून... तू एवढा गहिरा विचार (साहित्यीक शब्द, उधार घेतला आहे काल्पनिक प्रेयसीच्या खर्या प्रियाकराकडून, पुणेरी लेखकाला असे शब्द उत्तरामधे ऐकवावे लागतात ) करतोस माहीत नव्हते रे...खरेतर तू एवढा गहिरा विचार करू शकशील असे वाटले पण नव्हते... शब्द्सागरात गोते मारून मोती वेचून घेऊन आला आहेस मित्रा .... पण तुझ्या क्षमतेला पूर्ण न्याय नाही देत आहेस तू.... अजुन बराच सुधारू शकतोस...(स्पेशल पुणेरी)..."

तिसर्या लेखाची प्रतिक्रिया ..
"सुरेख.... शब्दच सुचत नाहीयेत... तू स्वत:ला हौशी लेखक म्हणवतोस हा तुझा नम्रपणा आहे (वास्तविक पाहता तू लेखक पण नाहीस रे बाबा....)... कोणी मस्करी केली तुझ्या १-२ लेखांची तर एवढा नाउमेद का होतोस... (माझी मस्करी ह्याच्या पर्यंत नाही पोहोचली हे लेखावरून स्पष्ट आहे... नाहीतर मला आला नसता... सुटलो असतो मी...) मान्य की अजुन तू seriously बघत नाहीस लेखनाकडे....केवळ विरंगु
ळा म्हणून लिहितोस... पण त्यात पण केवढा मतितार्थ असतो... (उधार परत) .... तू लेखन बंद केलेस तर... छे छे कल्पना पण नको करूस.... बाकी मी काय प्रतिक्रिया देणार... मला फार काही कळत नाही... पण तू लिहितोस ते मला भावते....(उधारी बास आता ).... चांगला मित्र आहेस.... (लेखक नाहीयेस चांगला तो भाग वेगळा) .... तुझ्या विषयी वाटते म्हणून सांगतो (आणि स्वत:विषयी पण)... बाकी तुला मी काय समजावणार...

एवढे सगळे करूनही लिहिणारे लेख लिहित जातात.... आणि मी आपला प्रतिक्रिया लिहित जातो.... कधीतरी वाटते... एकदा सरळ सांगावे की बाबानो खुप वाईट लिहिता ... बास करा आता..... पण नंतर त्यांच्या लेखांचे उपकार पण आठवतात... आज पर्यंत कधीही विनोद मारायला असेच तर लोक कामी आले आहेत.... त्यांचे ते उपकार स्मरून मी गप्पा बसतो आणि त्यांचा चेव वाढतच जातो.....

ता.क.खर्या साहितिकांविषयी लेखकाला नितान्त आदर आहे..... येथे कोणाचीही चेष्टा करण्याचा उद्देश नाही... सर्व घटना व पात्रे काल्पनिक आहेत...... काही साधर्म्य सापडल्यास योगायोग समजावा.... काही गोष्टी आवडल्या नाहीत तर मनावर घेऊ नये(एक पुणेरी सल्ला).... उपरोधात्मक दृष्टिकोन बाळगणे फायदेशीर ठरेल....





लेखक : गुरुप्रसाद आफळे

19 comments:

नाट्यगंधार said...

Ekdam Zakas... Vaidarbhiya bhashet Mahol!!!

Unknown said...

hahahahahahahha
sundar
maja aali bryach divasanni tuza lekh vachayala milala.........
asech lihit ja (tu sangitlyapramane ha tomana navhe )
kharokhar maja aali
aani satya kate asata re asa char-chaughat asa bolu naye ekhadyala.........hehehehehe
assal puneri bhasha bharbharun vahatiye tuzya lekhanitun
maja yete........sadashiv pethebaddal kahitari lihi...ajun maja yeil

Shailesh said...

पण तुझ्या क्षमतेला पूर्ण न्याय नाही देत आहेस तू.... अजुन बराच सुधारू शकतोस

Aditi...... said...
This comment has been removed by the author.
Aditi...... said...

wah!!!!
varche sagle khara boltayt..... uttam.. jamlay ho tumhala.....

Unknown said...

abbe kevadha motha lekh lihila ahes

Amrish said...
This comment has been removed by the author.
Amrish said...

khupach chaan
blogs cha afaat abhyas kelela distoyes :)
aani madhli udaharane khupach zakaas. "मी आज उत्तम शिक्रण केले, ते खाऊन आमचे मांजर देवाघरी गेले...." vishesh aavadle :)
lekh motha hota tyamule tappya tappyane vachala pan maja aali.
ajun vachayla aavadel

harshwardhan said...

हेहे ... चांगला लिहिला आहेस...nice work.. keep it up...."...


blog walyancha CHHAL-WADAAla tyanchyach bhashet pratuttar... prayatna agdi wakhananyajoga aahe !!

Chinmay said...

puneri shuddha marathi boli bhaashecha utkrushta vaapar :) lokanna thodya velani kalat asel tu tyanna kay mhatlas te :) arthat jar tujhya ajubajula PuLancha sahitya na vachleli loka astil tar tyancha tar jara avghad vattay..

Aso, uttam lekhan, vichar mandanyachi paddhat saglach surekh.

Ajun uttam lihi..

Rahul Jiresal said...

masta lihilays !!! (no sarcasm intended) :P
asach lihit ja.. (kharach.. :P)

Unknown said...

mala vatata ki apan 'shrimanta dusare bajirao saheb yanche shudhalekhan' kinva 'bajari waril kid' ya warahi changala lihu shakata........ya vishayawar apalyashi ekada charcha karayachi ahe

Aditi...... said...

majhi stuti karto ti pan ashich aste mhanje.... :O

Guruprasad said...

To Ranjeet...

Sadhyaa aamche sanshodhanaache vishay badalele aahet...
धान्याधारित आसवनी व एकात्मिक घटक अर्थसहाय्य – 2007

haa aamchyaa sanshoDHANAAchaa navaa vishay aahe.. jyaat Dhan asel tyaatach sanshodhan karaave asa aamchaa nav-varshaachaa sankalp aahe... :P

Heeral said...

Hi..pls make english or hindi translated blog..i wanna understand!

Guruprasad said...

@Heeral...

This is a special version of Marathi known as Puneri Marathi.. I dont know whether I will be able to translate it into Hindi or English without changing original meaning.... But will try to do that.... (may be during next break...) ..

AKSHAY BHAT said...

by posting this blog post you have become one of the kind you hate, see its recursive

Atul said...

प्रसाद,मस्त रे! वाचताना मजा आली!

Ameya said...

Took me a while to read long post..Good writing!
LOL on "वो चहा कप में ओतते ओतते मेरे हात पे सांडा और मेरा हात बहुत भाजा"