Tuesday, November 25, 2008

अस्सल पुणेरी

एस टी स्टैंड म्हणजे एक "अलौकिक" जागा आहे .... सर्व प्रकारचे लोक बघायला मिळतात .... जत्रेला जाणार्यान्पासुन ते "International Festival" ला जाणार्यापर्यंत ... बारश्यापासून ते १३ व्या पर्यंत जाणारे लोक... लाल डब्याने जाणार्यान्पासुन ते "AC Volvo" ने जाणार्यापर्यंत..... अगदी सर्व तर्हेची माणसे दिसतात ..... त्यांच्या हाव भावांमुळे ( किंवा अभावामुळे ) सहज ओळखु पण येतात .... उदा . लाल डब्याने जाणारी माणसे एकदम बिनधास्तपणे बोलत असतात ... बाजुच्याची विशेष माहिती नसतां सुद्धा त्याच्याशी निवांत बोलायला सुरुवात करतात... हयात जर चुकून एखादा/दी volvo वाला आला तर त्याला ओळखणे एकदम सोपे ... फ़ोन वर बोलताना किंवा आजू बाजुश्याशी बोलताना (चुकुनच असे होते) तो / ती कमीत कमी वेळा तरी " volvo" मिळाली नाही म्हणुन हां ताप आहे" असे ऐकवत असतो/ते.... volvo ने जाणारी माणसे मात्र चेहर्या वर अतिशय गंभीर भाव आणून वावरत असतात... चुकून सुद्धा हसत नाहीत ... सारखे फ़ोन कानाला लावून असतात ... वडा पाव , समोसे वगैरे घेता "burger, chips " घेतात .... पाणी पण "bisleri" वगैरे घेतात... फ़ोन वरुन बोलताना सुद्धा उगाचच आपण किती मोठ्या पदावर आहोत किंवा किती मोठ्या कंपनी मधे आहोत हेच ऐकवत असतात... आणि ह्या दोन्ही च्या मध्ये "Asiad" ने जाणारी माणसे .... त्याना शेजाराच्याशी बोलायाचे पण असते..... पण ओळख नसताना कसे बोलायाचे.... म्हणुन मग एकटेच बसतात ... ह्याना फ़ोन वर बोलायाचे सुचते ... फ़ोन पण करतात ... पण समोरची व्यक्ति नेमकी बिजी असते..... मग कधी कर्मधर्मसंयोगाने पेपर वाला जवळ आला तर पेपर घेउन वाचत बसतात..... पण गाड़ी सुरु झाली की ते पण नको होते... आणि मग एकटेच कंटाळतात

अश्या ह्या सर्व समावेशक एस टी स्टैंड वर अनेक विसंवादी पात्रे असतात ... त्यांच्यातील संवाद अतिशय विनोदी बनू शकतात ... त्यातून जर गाड़ी लेट झाली असेल आणि कंट्रोलर प्रवासी, दोन्ही पार्ट्या "खाष्ट पुणेरी " असतील तर मग विचारायलाच नको...

वेळ : कुठलीही (बस येण्याची )

ठिकाण : स्वारगेट बस स्थानक

नेहेमी प्रमाणे बस येण्यास उशीर होऊ लागला होता. तसा काही फार उशीर नव्हता झाला...एस. टी. महामंडळाच्या (अलिखित) नियमाप्रमाणे १५-२० मिनिट इकडे तिकडे होणारच (पण कधीच गाड़ी "इकडे" होत नाही कायम "तिकडेच" का होते?? हे कधीही सुटलेले कोड आहे). शेवटी त्यानाही काही मर्यादा आहेतच...काही ठिकाणी त्यांचा सुद्धा अगदीच "णाइलाज" (एस टी महामंडळाचा " पेशल" उच्चार) ( No offenses meant :P ) होतो. काय करणार ?? कधी कधी गाड़ी "ट्रोफिक" मधे अडकते... डिझेल वाले लोक रुसून बसतात , वाहक ऐन वेळी गायब होतात , वाहक आहे तर चालक नाही , चालक आहे तर वाहक नाही , दोघे आहेत तर गाड़ी नाही , गाड़ी, चालक आणि वाहक - तिघेही आहेत पण डिझेल वाला नाही ... अनंत अडचणी असतात... पण कसलेही टेंशन घेता तिथले कंट्रोलर साहेब सर्व प्रकारच्या " पब्लिक" ला तोंड देत होते आणि स्वारगेट असल्या मुळे दणदणीत उत्तरे देऊन एखाद्याला "तोंडघशी" पण पाडत होते ... असेच काही बस लेट होण्याच्या वेळचे प्रेमळ संवाद ... स्वतः ऐकलेले ...... आणि ऐकवलेले ही

"स्वछता" मोहिम चालु असल्याने प्रचंड धुळ उड़त होती... पावसाळ्याचे दिवस आणि ३६ तासात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेकडून वर्तवली गेली असल्याने सर्व प्रवाशी निश्चिंत होते ... कारण ही त्यांची आणि वेधशाळेची सांकेतिक भाषा होती ..... म्हणजे अधिकृत रित्या नव्हती ... पण "३६ तासात मुसळधार पावसाची शक्यता आणि पुढचे दिवस temperature ३६ डिग्री सेल्सियस" असे काही विलक्षण पूर्वानुभव गाठीशी ..... पण कधी कधी स्वप्नामधे पाहिलेले खरे होते म्हणतात तसाच काहीसा अनुभव आला आणि अचानक खरोखरच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली... पावसाचा फायदा म्हणजे धुळ उडायची बंद झाली... .पण जे लोक बाहर थांबले होते ते पण आत आडोश्याखाली आले त्यामुळे गर्दी तेवढीच राहून पण जास्त वाटु लागली
प्रवासी वैतागलेले होते ..ते अजुन वैतागले ...... कंट्रोलर साहेब पण जरा चिडलेले दिसत होते.... कारण गाड़ी उशिरा येण्याचे कारण "मानवी स्वभावातील गुण दोष " (राग लोभ शी ) निगडित होते .... बराच वेळ झाला ... अजुन काही डिझेल वाले आणि वाहक यांच्यातील सं"वाद" संपला नसेल ह्या अपेक्षेत कंट्रोलर साहेब ... ... ... पण समोरच्या पब्लिक ला तसे काही जाणवून देता ते शक्य तेवढ्या शांतपणे उत्तरे देत होते.... त्यातल्या त्यात रिलीफ़ म्हणजे एसी गाड़ी लेट झाली होती.. पब्लिक तसे शांत होते... उगीच कुणी आवाज वाढवून बोलत नव्हते ... फार तर फार तक्रार करायची धमकी होते ... पण .. ..१५ - २० मिनिटे करून करून तास, मग .३० तास आणि शेवटी तास झाले आणि हळु हळु प्रवाश्यांच्या सहनशक्तीचा बांध फुटला ...

प्रवासी १ : साहेब , गाड़ी कधी येणार ??? १५ -२० मिनिट करता करता १२० मिनिट झाले .....
साहेब : अहो काका, गाड़ी अडकली असेल " ट्रोफिक " मधे ... (बाजुच्या तरुण मुला कड़े बघून ) आता तुम्हाला पण माहिती आहे ना राव पुण्यात ट्राफिक ( इकडे बरोब्बर उच्चार ) कसे असते त्यात रस्ते बेकार वगैरे वगैरे ...
तरुण मुलगा (कुणीतरी मत विचारले म्हणुन एकदम खुश होउन) : नाहीतर काय हो काका... अगदी शिस्त म्हणुन नाही लोकाना .... अरे नियम जरा म्हणुन पाळायाचे नाहित.... अशाने रस्त्यात Traffic Jam होणार नाही तर काय होइल... ( इकडे त्याचा पत्ता लक्षात येतो )
प्रवासी २ : पण साहेब , हे रोजचेच झाले आहे.... extra गाड़ी सोडा ना...
सा. : साहेब अजुन किती गाड्या सोडणार आम्ही तरी.... थोडा वेळ वाट पहा
त . मु . : वाट पाहून पाहून वाट लागेल आता.... ह्या पेक्षा प्राइवेट ने गेलो असतो तर बरे झाले असते...
तेवढ्यात तिकडून २ तरुण , धडाड़ीची वाटणारी मुले येतात .....
पहिला तरुण धडाड़ीचा मुलगा : काका, गाड़ी कधी पासून डेपो मधे उभी आहे... कधी काढणार ???
सा : काय सांगता .... गाड़ी डेपो मधे उभी आहे ???? अहो पण त्यानी आम्हाला रिपोर्टिंगच नाही केले अजुन .... तिकडे डेपोचे कंट्रोलर आहेत त्याना जाउन विचारा .... ("कसा टोलावला" ह्या विचारात साहेबांचे विजयी हास्य )
दुसरा तरुण धडाड़ीचा मुलगा : काका, चौकशी असे लिहिले आहे तुमच्या समोर .... आम्ही तुमच्याशी बोलणार नाही तर तुम्हाला दुसरे काम कसले?? तिकडेच जाउन विचारायचे आहे तर मग काउंटर बंद करा , तेवढाच एस टी महामंडळाचा फायदा तरी होइल...
सा : ( तोंड छोटे करून) अरे आम्ही तरी काय करणार.... ते लोक आम्हाला वेळेवर रिपोर्ट नाही करत... जरा समजुन घ्या ना ...
प . त . ध. मु . : ते तुम्ही काय ते बघून घ्या... गाड्या वेळेवर सोडा... मग आम्ही समजुन
घ्यायला काय , विचारायला पण येणार नाही....
पुण्यात आयुष्य गेलेल्या १ आजी : बाळा , चीड चीड नको करूस , त्याना काही फरक पडत नाही .... प . त . ध. मु . : फरक कसा पडत नाही... पडला पाहिजे .... एस टी काय घरची आहे का.... दु . त . ध. मु . : (उपरोधात्मक स्वरात) ओ साहेब , बाहेर या , तुम्हाला दाखवतो डेपो च्या कंट्रोलरला, कंडक्टरला कसे शोधायाचे आणि गाड़ी कशी डेपो मधून बाहर घेउन यायची ते ... या जरा काचेच्या बाहेर या....
( त्या २ त . ध . मु . ना असे बोलताना बघून इतर प्रवाशाना सुद्धा जोर चढला .... आणि काही इतर तरुण ( पण धडाडी नसलेले) आदरयुक्त कौतुकाने बघू लागले... २ तरुणांनीं तर त्या २ त . ध . मु . ना बसायला जागा सुद्धा देऊ केली... पण त्यानी ती अतिशय तुच्छतेने नाकारली .. दु . त . ध . मु . चे असे बोलणे ऐकून इतर प्रवासी त्याच्या मदतीला धावले... एकंदर रंग पाहून आणि दु . त . ध. मु . जरा जास्तच धडधाकट असल्याने कंट्रोलर साहेब जरा बिचकले....... )
सा : जातो... आणतो गाड़ी... नसेल तर नवी घेउन येतो विकत .... डोक्याला ताप झाला आहे रोजचा ....
धो धो पावसात लोक गरम का झाले ह्याचा विचार करत साहेब डेपो मध्ये गेले ....

( हां प्रेमळ सं"वाद" चालु असताना काही मुंबई चे लोक आपापसात ... "काय हो पुण्यात उत्तरे देतात .... मुंबई सारखे धड बोलत पण नाहित " , "ही काय बोलायची पद्धत झाली??? " इ इ असे बोलत होते )




... बराच वेळ झाला तरी दोघांचा पत्ता नाही.....तेवढ्या वेळात "काय गाडी बनवायला गेले आहेत की काय" असा एक उत्कृष्ट टोमणा त्या "मत विचारल्या गेलेल्या तरुण" मुलाकडून आला ... अखेर बऱ्याच वेळाने गाड़ी आणि साहेब दोघेही आले (साहेब गाड़ी मागुन चालत आले ... बहुधा ड्राईवर आणि साहेब ह्यांचाही प्रेमळ सं"वाद" झालेला दिसतो.... कारण ड्राईवरसाहेबानी तेवढ्यात काही वाईट शब्द वापरले ... xxxxx ).... साहेबानी गाड़ी आणल्या नंतर एकाच गलका होतो आणि सर्व लोक त्या गाडीत अक्षरशः घुसले आणि गाड़ी चालु झाली .... पुढे काय झाले ते (अर्थातच) त्या प्रवाशाना ठाउक...
(समाप्त)

वि सु . : लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित ... ... लेखक आणि त्याचा भाऊ ह्या सत्य घटने मधे "धडाडीनें" सहभागी ...

लेखक : गुरुप्रसाद आफळे
दिनांक : २५/११/२००८
कार्तिक कृ. १३, शके १९३०
मंगळवार

8 comments:

Unknown said...

hahahahahahahahhaha
sundar vakyarachana
aani vakyanchi f-o-d karun pratyek jagevar changala vinod sadhala aahe
ST ha 1 changala aani kadhi na sampanara vishay aahe
3 taas ushir zala ki dokyacha kaay hota te jo 3 taas thambalay tyalach kalu shakate
aani kahi vakye (kautukaspad) lekhakabaddal lihileli aahet ase BHASATE.... haha
farach chhan
asech lihit raha
shubhechchha!!!!!!!!!!!!!!!!!

Guruprasad said...

Aho... lekhak aani tyachyaa bhaau he doghe tyaa ghatane madhe sahabhaagi jhaale hote .. aapalyaalaa tari maahiti paahije...

amit_ashtoorkar said...

धडाडिचे कार्यकर्त्रे कोण ते कळाले....... बर का....?????

असो ले्खका्चे निरि्क्शण चान्गले आहे.
असेच लिहित रहा...


--- शुभेच्चा...
आपलाच!!!!!
अमित अष्टु्रकर.

aditi_railkar said...

hey khara ahe yatla shabd ni shabd,.... me pan barechda hey anubhavlay... tirsat uttar detat te lok nehemi... 100% barobar ahe hey......
very good
keep writin such blogs....
good luck

Unknown said...

'महामन्डल' अतिशय् मस्त असा लेखनाचा विषय घेवून लेखकाने ' फ़ुल्ल्टू धमाल' घातली आहे.

मला नेहमी वाटते की 'SYSTEM' मध्ये सुधारणा करण्याची संधी नेहमीच उपल्ब्ध असते.

याचा आनन्द घेता घेता आप आपल्या परिने सुधारणा करण्याची गरज आहे.


मस्त विषय आहे,

असेच लिहित रहा...

abhi said...

are sagale khare ahe...tumi doghehi kela te 101 taka barobar ahe...pan ajun zara udayla pahije hota...ani ajun kahi tari naveen kise kara...keep it up

HK-47 said...

ahhhhh! No...no...NOoooo!
ST...I hate st!
I hate ST STAND

thats all I can say....I wonder how much he stayed there to write all this.

Amrish said...

chchaan aahe. Vinod chaan sadhla aahe.
Mala tya don ta. dha. mu. che kautuk vatale.
good one.